थंडीचा जोर वाढला !

Ahmednagarlive24
Published:
मुंबई :- शुक्रवारी मुंबईतील तापमान १९.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. नोव्हेंबर महिना सुरू झाला की थंडी सुरू होते.
मात्र मुंबईत जवळपास महिनाभर थंडी गायब झाली होती. त्यामुळे हिवाळा सुरू होऊन गुलाबी थंडीची प्रतीक्षा मुंबईकरांना होती. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत थंडी सुरू झाल्याने मुंबईकरांना हिवाळा जाणवू लागला आहे.
मुंबईत माझगाव, दादर, पवई येथील कमाल तापमान २८ अंश, तर चेंबूर व पवई येथील किमान तापमान १९.५ अंशाच्या आसपास नोंदवण्यात आले.
तर घाटकोपर हे ठिकाण उबदार म्हणून नोंदवण्यात आले आहे. शनिवारी मुंबईत आकाश निरभ्र राहणार असून तापमान कमाल ३२ अंश व किमान २२ अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment