नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याकांडातील एका आरोपीच्या फेरविचार याचिकेविरोधात पीडितेच्या आईने शुक्रवारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.
या याचिकेद्वारे त्यांनी आरोपीची फेरविचार याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली आहे. अवघ्या देशाला हलवून सोडणाऱ्या या प्रकरणातील अक्षय कुमार नामक आरोपीने आपल्या मृत्युदंडाविरोधात सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली आहे.
कोर्ट त्यावर मंगळवारी सुनावणी करणार आहे. ‘निर्भया’च्या आईने शुक्रवारी सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या नेतृत्वातील खंडपीठापुढे हा मुद्दा उपस्थित करत दोषीची याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली.
त्यावर न्यायालयाने या मुद्यावरही येत्या १७ तारखेलाच विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाने गतवर्षी ९ जुलै रोजी या प्रकरणातील मुकेश, पवन गुप्ता व विनय शर्मा या ३ आरोपींची फेरविचार याचिका फेटाळून लावली होती.
या आरोपींवर दिल्लीतील एका २३ वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.