राडा करणार्‍या ‘त्या’ 11 आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- नगर तालुक्यातील दरेवाडीत दोन गटाच्या राजकीय पदाधिकार्‍यांमध्ये सोमवारी सकाळी राडा झाला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 12 आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. (Ahmednagar Crime)

त्यातील 11 आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांची तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी दरेवाडीत दोन गटामध्ये वाद झाला. हा वाद भिंगार पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर तेथेही दोन गट भिडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या महिलांनी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 20 जणांविरूद्ध विनयभंग व मारहाणीच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

तर तिसरी फिर्याद पोलिसांनी दिली आहे. यामध्ये 22 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe