अहमदनगर- सावेडी परिसरातील गुलमोहोर रोडवर नवलेनगर येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तुम्हाला पैसे पाठवतो, असे सांगून अज्ञात इसमाने साडे चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि.५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाऊसाहेब विष्णू डमाळे (वय ४१, रा.गजानन कॉलनी, नवलेनगर, सावेडी) यांना अज्ञात इसमाने ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान कँरोल डायन हे नाव सांगणाऱ्या अज्ञात इसमाने व स्टेट बँकेचे चार खातेदारांनी पूरग्रस्तांसाठी मदत तुम्हाला पाठवतो असे खोटे सांगून त्यांची एकूण ४ लाख ५३ हजार ८५० रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी भाऊसाहेब डमाळे यांच्या फिर्यादीवरुन सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान २००० कलमप्रमाणे फसवणूक केल्याच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.