जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या सत्तेसाठी हा नेता आक्रमक !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- जिल्हा परिषदेत राज्यातील सत्तेप्रमाणे महाविकास आघाडीची सत्ता आणण्याच्या दिशेने राष्ट्रवादीने पावले टाकली आहेत. पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांची शनिवारी नगरमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बैठक घेतली.

अध्यक्षपदासाठी इच्छुक असणार्‍यांना पक्षाकडे अर्ज करण्यास देखील यावेळी सुचविण्यात आले. शनिवारी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची पक्ष कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला पक्षाचे निरिक्षक तथा आ.दिलीप वळसे पाटील मार्गदर्शन करणार होते. मात्र आ.वळसे पाटील यांना येण्यास उशिर झाल्याने जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बैठकीचे नेतृत्व केले.

यावेळी जिल्हा परिषदेतील सत्तासुत्र, याच सोबत मित्र पक्षाचे संंख्याबळ, पक्षातून गेलेले जुन्या सदस्यांचे काय करायचे, याबाबत प्राथमिक चर्चा झाली.

विद्यमान परिस्थितीत जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सर्वाधिक सदस्य असणारा पक्ष ठरणार आहे. यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक असणार्‍यांनी पक्षाकडे तशी लेखी स्वरूपात इच्छा व्यक्त करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी नव्याने गट नोेंदणी करावी की अन्य पर्यायांचा वापर करावा, याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment