हार मानतील ते घनश्याम शेलार कसले ? माजीमंत्री पाचपुते यांना हरवण्यासाठी शेलार यांनी उचलले हे पाऊल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- दोन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आ.बबनराव पाचपुते आणि यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत घनश्याम शेलार यांना पराभव पत्कारावा लागला पण हार मानतील ते घनश्याम शेलार कसले ? त्यांनी आता कायदेशीर आखाड्यात उडी घेतली आहे.

घनशाम प्रतापराव शेलार यांनी श्रीगोंद्याचे आमदार बबनराव भिकाजी पाचपुते यांच्याविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

या निवडणुकीत अवघ्या साडेचार हजार मतांच्या फरकाने पाचपुते विजयी झाले आहेत. मात्र या निवडीला आक्षेप घेत याचिका दाखल झाल्याने पुन्हा एकदा श्रीगोंदा मतदारसंघातील निवडणूक चर्चेची ठरत आहे.

शेलार यांनी याचिकेबाबत अधिक माहिती देण्याचे टाळले. या निवडणुकीत मतमोजणी वेळी मतांच्या बेरजेत तफावत आसल्याने रात्री उशिरापर्यंत हा निकाल राखीव ठेवला होता.

मात्र नंतर पाचपुते यांना विजयी घोषित केले होते. याच वेळी शेलार यांनी हरकत नोंदवली होती, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हरकत फेटाळून लावली होती.

उमेदवारी अर्ज भरताना गुन्ह्यांची माहिती लपविणे, खोटी माहिती सादर करणे, संपत्तीची माहिती लपविणे, निवडणुकीचा खर्च वेळेत सादर न करणे आदी कारणे याचिकेत दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment