दूध विक्री दरात झाली इतक्या रुपयांची वाढ

Ahmednagarlive24
Published:

पुणे : दूध खरेदी-विक्रीच्या दराचा आढावा घेण्यासाठी राज्यातील सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची  शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

कात्रज डेअरी येथे झालेल्या बैठकीत सोमवार (दि. १६) पासून दूध विक्रीच्या दरात प्रतिलीटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्याशिवाय शासनाकडे थकीत असलेल्या दूध खरेदी अनुदानासाठी, तसेच कर्नाटक सरकारप्रमाणेच दूध खरेदीसाठी प्रतिलीटर ५ रुपये अनुदान शासनाने द्यावे.

सदरची रक्कम थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, या मागणीसाठी पुढील आठवड्यात कल्याणकारी संघाचे शिष्टमंडळ दुग्धविकास मंर्त्यांना भेटणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment