पुणे : मी माझे गूढ कधीही उकलणार नाही. मला बंधन घालू नका, असे विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापण्याच्या केलेल्या प्रयत्नाबाबत पवार यांनी हे सूचक विधान केले.
आता पुन्हा भाजप शिवसेनेला अप्रत्यक्षपणे सत्तास्थापनेची ऑफर देत आहे, त्याबद्दल विचारता ते म्हणाले, ‘कोणी कोणाला ऑफर द्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न पण आता महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे.
पुण्यातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पवार बोलत होते. पवार म्हणाले, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची विचारसरणी साधारणपणे एकच आहे. शिवसेनेची विचारसरणी वेगळी आहे हे सगळ्यांना माहीतच आहे. पण राज्यात जी परिस्थिती निर्माण झालीय त्या परिस्थितीत महाविकास आघाडी तयार झालीय.
ज्यावेळी असे ‘कोॲलिशन गव्हर्नमेंट’ असते तेव्हा ज्यामध्ये मतमतांतरे असतात, ते विषय मागे ठेवायचे असतात. ज्यात लोकांचे हित असते. महाराष्ट्राचे हित ज्यात आले अशा विषयांना अग्रक्रम द्यायचा असतो.