श्रीगोंदे :- मुलाने केेलेल्या आत्महत्येचा धक्का सहन न होऊन वडिलांचाही मृत्यू झाला. ही घटना शेडगाव येथे शनिवारी घडली.
नापिकी, सोसायटीचे कर्ज व सावकारांच्या जाचाला कंटाळून शेडगाव येथील धनाजी संपत धेंडे (वय ४६) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
त्याचा धक्का बसल्याने त्यांचे वडील संपत नामदेव धेंडे (वय ६२) यांचाही मृत्यू झाला. धनाजी धेंडे हे शेतात पारंपरिक पिके घेत.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातून खर्चापेक्षा उत्पन्न कमी येत असल्याने सोसायटी, बँक व सावकारांकडून घेतलेले कर्ज ते फेडू शकले नाहीत.
कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. धनाजी यांच्या मुलीचे लग्न ठरले होते. धनाजी व त्यानंतर काही वेळातच त्यांचे वडील संपत यांचे निधन झाले.