अहमदनगर :- माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे तसेच शिवाजी कर्डिले व स्नेहलता कोल्हे या भाजपच्या जिल्ह्यातील तीन माजी आमदारांनी आमदार टीका केल्यांनतर त्यांचा विरोध लवकरच मवाळ होण्याची शक्यता आहे.
राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात एल्गार पुकारला असला तरी या तिघांचा विखेविरोध पेल्यातील वादळ ठरण्याची शक्यता आहे कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास गोटातील म्हणून विखे ओळखले जात असल्याने या नाराज तिन्ही माजी आमदारांची त्यांच्याकडूनच समजूत काढली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तीन माजी आमदारांच्या आरोपातील हवा काढण्यासाठी विखेंना आता कर्तृत्व पणाला लावत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपला मिळवून देण्य़ासह आगामी जिल्हा सहकारी बँकेतही भाजपची सत्ता आणण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.