तुम्हाला जगायचे का? म्हणत लाथाबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ

Ahmednagarlive24
Published:

नेवासा :-  तालुक्यातील गोयेगव्हाण येथे राहणारी विवाहित तरुणी सौ. प्रिती प्रदीप नवथर, वय २७ हिचे पती प्रदीप नवथर, सासरे संभाजी नवथर या तिघांना ५ जणांनी मोटार सायकलवर येवून काही एक कारण नसताना विनाकारण तुम्हाला जगायचे का? असे म्हणत लाथाबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ केली.

दगडाने प्रदीप नवथर यांच्या पायावर मारले. यात तरुणीचे मंगळसूत्र गहाळ झाले. सौ. प्रिती प्रदीप नवथर या तरुणीने नेवासा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी बबन सानाथ नवथर, अर्जुन बबन नवथर, दादासाहेब बबन नवथर, सर्व रा. नेवासा, राधाकिसन भाऊसाहेब नवले, रा. वाकडी, ता. नेवासा, लंघे पूर्ण नाव माहीत नाही या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment