Omicron Maharashtra Update ; आता काळजी घ्यावीच लागेल… राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी 6 रुग्णांची नोंद !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  महाराष्ट्राची काळजी वाढवणारी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात ओमिक्रॉनचे परवा ८ नवे रुग्ण आढळले असताना काल रात्री (शनिवार १९ पर्यंत) पुन्हा रुग्ण नवे रुग्ण आढळल्याने राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.(Omicron Maharashtra Update)

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ओमिक्रॉनच्या ६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणात आढळले असून पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

या बरोबरच राज्यातील एकूण ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या ५४ वर पोहोचली आहे. राज्यातील ओमिक्रॉनची बाधा झालेल्या ५४ रुग्णांपैकी सर्वात जास्त २२ रुग्ण मुंबईत,

पिंपरी चिंचवडमध्ये ११, पुणे ग्रामीणमध्ये ७, पुणे महापालिका क्षेत्रात ३,साताऱ्यात ३, कल्याण डोंबिवलीत २, उस्मानाबादमध्ये २ तर, बुलडाणा, नागपूर, लातूर आणि वसई विरारमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. या ५४ रुग्णांपैकी एकूण २८ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News