अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन सोमवारी (दि. १६) दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रांत कार्यालयासमोरकेले.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भाजपचे ३१ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या सभेत स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची बदनाम करणारे द्वेषमूलक वक्तव्य केले आहे.
त्यामुळे संगमनेर येथील भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, रामचंद्र जाजू, मनोज जुंदरे, वैशाली तारे, हेमलता तारे, मेघा भगत, ज्योती भोर, ललिता मालुसरे, दीपक भगत, भारत गवळी, मनीषा पंधारे, दिनेश सोमाणी, दिलीप रावळ, अमोेल रणाते, विकास गुळवे, संपत गेठे, शिवकुमार भांगरे, शिरीष मुळे, योगराज परदेशी, कल्पेश पोगुल, विनायक थोरात, दीपेश ताटकर, जगन्नाथ शिंदे, बाबासाहेब इंगळे, ज्ञानेश्वर माळी, ज्ञानेश्वर कर्पे, अशोक शिंदे, शैलेश फटांगरे, सचिन शिंदे, शरद मोेरे या सर्वांनी विनापरवाना एकत्र जमून मोर्चा काढला.
त्यानंतर त्यांनी खा. राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. याप्रकरणी सहाय्यक फौजदार बाळासाहेब पारधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.