पावभाजी विक्रेत्याच्या गॅसटाक्या चोरल्या

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  अलीकडे चोरट्यांचे काही सांगता येत नाही. ते कोणत्याही वस्तूची चोरी करतील ते सांगत येत नाही.(Theft)

दिवसेंदिवस वाढत असलेल्या गॅसच्या किमतीमुळे आता चोरट्यांनी गॅसच्या टाक्या देखील चोरी करण्याच्या घटना घडत आहेत.

सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील एकविरा चौकात असलेल्या पावभाजी विक्रेत्याचे दुकान फोडून चोरट्यांनी गॅसटाक्या चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी मोहन विष्णू कोटकर (वय ३७, रा. गजराज फॅक्टरी शेजारी, गोकुळनगर, भिस्तबाग चौक) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोटकर यांचे एकविरा चौकात पावभाजी विक्रीचा व्यवसाय आहे. चोरट्यांनी त्याच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

दुकानातील दोन गॅसटाक्या, दोन लोखंडी तवे, शेगडी, सहा स्टीलचे मसाले ट्रे चोरून नेले. याप्रकरणी कोटकर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस नाईक आव्हाड हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe