अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : भिंगारमधील सैनिकनगर येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, विश्वस्तांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहाता तालुक्यातील पिंप्रीनिर्मळ येथील प्रसाद दत्तात्रय सोनवणे (वय-३४) यांना सहा.शिक्षक पदावर नियुक्ती करून देतो.
म्हणून त्यांची २६ लाख ३० हजार रूपयांची फसवणूक केल्याची फिर्याद त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिली आहे. आता पर्यंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष व विश्वस्तांविरुद्ध आठ गुन्हे दाखल झाले आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार अनिता सुभाष साळवे, संस्थेचे सदस्य संजय बन्सी साळवे, रेखा संजय साळवे (सर्व रा. आलमगीर रोड, विजयनगर, भिंगार), सचिव अनिल तुळशीदास शिंदे, उपाध्यक्ष मंगल अनिल शिंदे (दोघे रा.इंदिरानगर, श्रीरामपूर), राजू बन्सी साळवे (रा.खांडगाव, ता. पाथर्डी) यांचा समावेश आहे.
याबाबत सोनवणे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी यांनी संगणमत करून सह.शिक्षक पदावर नियुक्ती करून देतो म्हणून मुलाखत घेतली. तात्पुरता आदेश देऊन पगार वेळेवर देण्याची बतावणी केली.
फिर्यादीकडून १२ लाख ५० हजार रुपये घेतले. मानधन व पगार न दिल्याने फिर्यादी यांची २६ लाख ३० हजाराची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी यांनी भरलेली रक्कम व पगाराची मागणी केली असता आरोपी यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार वराट करत आहेत.