अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जखमी

 

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-   अज्ञात वाहन चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील इसम जखमी झाला आहे.(accident)

संदीप सुभाष जवळेकर (वय 36 रा. आकांक्षा कॉलनी, बुर्‍हाणनगर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. अहमदनगर-बुर्‍हाणनगर रस्त्यावरील दमडी मस्जीदजवळ हा अपघात झाला.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सुभाष जवळेकर यांनी फिर्याद दिली आहे.

संदीप जवळेकर त्यांच्या दुचाकीवरून अहमदनगरकडून बुर्‍हाणनगरकडे जात असताना पाठीमागून आलेल्या वाहन चालकाने संदीप यांच्या दुचाकीला धडक दिली.

या धडकेत संदीप जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अपघात झाल्यानंतर वाहन चालक वाहन घेवुन घटनास्थळावरून पसार झाला.