अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुर निंबादैत्य या गावात राजकीय वादातून आज (मंगळवार दि. 17) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास दोन गटात झालेल्या गोळीबारात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांच्या सह चार जण जखमी झाले.
यात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांचा जागीच मृत्यू झाला. या मुळे पाथर्डी तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे ज्ञानेश्वर अशोक दहिफळे (वय 30) , भीमराज जिजाबा दहिफळे (वय 60), सदाशिव अर्जुन दहिफळे (वय 50) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
मयत सरपंच संजय दहिफळे यांचे गावातीलच निवृत्त जवान शाहदेव उर्फ पम्प्या पंढरीनाथ दहिफळे यांच्याशी राजकीय वैर होते. या दोघांमध्ये पूर्वी तीन ते चार वेळा वाद झाले आहेत.
आज संजय दहिफळे यांच्यावर गोळीबार झाला. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.