अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतरावर बुधवारी हायस्पीड रेल्वे (ताशी 144 किलोमीटर) बारा डब्यांसह धावली.(Ahmednagar-Beed-Parli Railway)
बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच रेल्वे आल्यानं, हे चित्र डोळ्यात साठविण्यासाठी सोलापूरवाडी, धानोरा, कडा, आष्टी येथे लहान चिमुकल्यांसह स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती.
बुधवारी दुपारी 2 वाजता सदरील रेल्वे कडा येथून आष्टी येथे आली. तर दुपारी 4 वाजता आष्टी रेल्वे स्थानकावर बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये स्वागत करण्यात आले.
त्यामुळे आता हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अहमदनगर-ते आष्टी हायस्पीड रेल्वे धावणार आहे. दरम्यान यापूर्वी 17 मार्च 2018 रोजी नगर ते नारायणडोह दरम्यान सात किलोमीटरवर सात डब्यांच्या रेल्वेची चाचणी घेण्यात आली.
25 फेब्रुवारी 2019 रोजी नारायणडोह ते सोलापूरवाडी या 15 किलोमीटर अंतरावर सात डब्यांची रेल्वे चाचणी घेण्यात आली होती.
त्यानंतर 9 डिसेंबर 2021 रोजी दोन डब्यांच्या रेल्वेची चाचणी आष्टीपर्यंत घेण्यात आली होती. आता बारा डब्यांची हायस्पीड रेल्वे धावली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम