नववर्षाचे स्वागत करताना ‘ही’ काळजी घ्या… अन्यथा होईल कारवाई

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तसेच ओमिक्रॉनचा वाढलेला धोका यामुळे सरकारने काहीसे निर्बंध लागू केले आहे.(New Year Celebration)

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार थर्टी फर्स्ट आणि शनिवार नववर्षाच्या स्वागत सोहळ्यांसाठी राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे.

करोना नियमांचे नागरिकांनी पालन करावे, नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन करणार्‍यांविरोधा कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना अधीक्षक पाटील म्हणाले, करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जे नियम लागू केले आहे, त्या नियमांचे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पालन करावे.

सरत्या वर्षाला निरोप देताना मोठ्या प्रमाणात गर्दी जमवणे, पार्ट्या करणे, रात्री-अपरात्री नियमबाह्य पध्दतीने फटाके वाजवणे या सर्वांवर निर्बंध लावण्यात आले आहे.

यामुळे नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करूनच सरत्या वर्षाला निरोप द्यावा व नवीन वर्षाचे स्वागत करावे. तसेच नवीन वर्षाची सुरूवात चांगल्या पध्दतीने व्हावी,

करोना पासून कशी मुक्ती करता येईल, या कालावधीत करोनाचा प्रार्दुभाव पसरणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आव्हान अधीक्षक पाटील यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe