मंगल कार्यालय व लॉन्स मालक पुन्हा अडचणीत

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  संगमनेर | ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने पुन्हा निर्बंध लादले आहेत. विवाह समारंभ, मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांसाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तीची मर्यादा केली आहे.(ahmednagar news)

यामुळे मंगल कार्यालय व लॉन्स मालक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. निर्बंधामुळे मंगल कार्यालय व लॉन्स कार्यक्रमास दिल्यास मेंटेनन्सचा खर्च देखील सुटणार नाही.

नियमांचे उल्लंघन झाल्यास मोठा दंड होतो, तो देखील परवडणारा नसल्याने मंगल कार्यालये व लॉन्स पुढील आदेशापर्यंत बंद ठेवणार असल्याची माहिती मंगल कार्यालय असोसिएशनचे अध्यक्ष गोरख कुटे यांनी बोलताना दिली.

संगमनेरमध्ये यापूर्वी लावलेल्या निर्बंधामुळे मंगल कार्यालयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे आता पुन्हा निर्बंधाने पुन्हा व्यावसायिक अडचणीत आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe