अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी : तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुर निंबादैत्य या गावात राजकीय वादातून काल सायंकाळी सातच्या सुमारास दोन गटात झालेल्या गोळीबारात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांचा मृतू झाला होता.
या गोळीबारातील आरोपींना २४ तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले. ज्ञानेश्वर विष्णू दहीफळे , वय – २८ वर्षे ,राहुल शहादेव दहीफळे वय 22, भागवत हरिभाऊ नागरगोजे – ५० वर्षे यांना अहमदनगर येथून ताब्यात घेण्यात आले.
ज्ञानेश्वर अशोक दहिफळे (वय 30) , भीमराज जिजाबा दहिफळे (वय 60), सदाशिव अर्जुन दहिफळे (वय 50) हे किरकोळ जखमी झाले होते.
मयत सरपंच संजय दहिफळे यांचे गावातीलच निवृत्त जवान शाहदेव उर्फ पम्प्या पंढरीनाथ दहिफळे यांच्याशी राजकीय वैर होते. या दोघांमध्ये पूर्वी तीन ते चार वेळा वाद झाले आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com