शाळेच्या पटांगणात त्याने तिचा हात पकडला आणि मिठीत घेत केलं असं काही

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजही महाराष्ट्रात या घटना वाढतच आहे. यातच आता अल्पवयीन मुलींची छेडछाड आदी प्रकार वाढू लागले आहे.(Harassment of minor girls)

यामुळे महिलांचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच अशीच एक घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. रायगडमधील मुरूड तालुक्यातील एका शाळेच्या पटांगणात 15 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी आरोपीला रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी , 15 वर्षीय पीडित मुलगी शाळेत जात होती.

आरोपीने संबंधित शाळेच्या पटांगणात येऊन त्याने तिचा हात पकडला आणि मिठी मारुन चुंबन घेतल्याचा आरोप आहे. तू माझ्यासोबत ये, तुला पैसे देतो, असं बोलून आरोपीने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचा दावा केला जात आहे.

याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe