अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नागपूर :- काँग्रेसची विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करण्यासाठी तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार आहे,
असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
काँग्रेस पक्षाचा विचार हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विचार आहे. भारतीय जनता पक्षाच्या विभाजनवादी अजेंड्याला राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वाढविणारा काँग्रेसचा विचारच रोखू शकतो.
विधानसभा अधिवेशनानिमित्त नागपुरात असल्याने बाळासाहेब थोरात यांनी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील काँग्रेस कमिटीच्या बैठका बोलाविल्या आहेत.
याअंतर्गत त्यांनी नुकतीच भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांतील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील सद्य राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.