अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- राज्य सरकारने जिम आणि ब्युटी पार्लर व्यवसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने जिम आणि ब्युटी पार्लरसाठी असलेले निर्बंध शिथिल केले आहेत.
राज्य सरकारने कोरोना निर्बंधाचे सुधारित आदेश जारी केले आहेत. यामध्ये हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र यासह काही अटीही घालण्यात आल्या आहेत.

आता जिम आणि ब्युटी पार्लर्स ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. मात्र, याठिकाणच्या कर्मचारी आणि ग्राहकांनाही करोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ब्युटी पार्लर्स आणि जिम चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यात उद्यापासून हे नवीन निर्बंध असणार पहाटे पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी अत्यावश्यक कारणांशिवाय रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी सरकारी कार्यालयांमध्ये व्हिजिटर्सना परवानगीशिवाय प्रवेश नाही. लोकल ट्रेनवर कोणतेही निर्बंध नाहीत सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती बंधनकारक करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात उपस्थित राहण्याची परवानगी
विवाह सोहळ्याला फक्त ५० जणांना उपस्थित राहता येणार अंत्यविधीला २० जणांना उपस्थित राहता येणार राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ५० जणांच्या उपस्थितीची अट शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.
स्विमींग पूल्स, स्पा, वेलनेस सेंटर पूर्णपणे बंद राहणार केशकर्तनालय (सलून्स) ५० टक्के क्षमतेने चालवता येणार. सलून्स सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेतच सुरु ठेवता येणार नियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना निर्बंधांतून सूट. खेळाडुंना बायो बबलमध्ये राहावे लागणार.
प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहता येणार नाही. दर तीन दिवसांनी खेळाडुंची करोना चाचणी करणे बंधनकारक असेल. अम्युझमेंट पार्क, किल्ले आणि स्थानिक पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद राहतील.
शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येणार. मॉलमध्ये करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी हॉटेल्स आणि रेस्टारंटस सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत ५० टक्के क्षमतेने चालवता येणार.
महाराष्ट्रात प्रवेश करायचा असेल, तर कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी पीसीआ चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक एमपीएससी, यूपीएससी परीक्षेसाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्यांना हॉल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा दिली जाईल
लसीचे दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई होणार नाट्यगृह आणि सिनेमा थिएटर्स ५० टक्के क्षमतेने चालवता येणार.
करोन लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी. रात्री १० ते सकाळी ८ या काळात बंद ठेवावी लागणार. आंतरराष्ट्रीय विमानप्रवास केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत, केवळ कर्मचाऱ्यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेणे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम