अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- मनपाच्या प्रभाग ६ (अ) मधील एका जागेसाटी पोटनिवडणूक होणार आहे. या प्रभागात मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडमूक आयोगाने जाहीर केला आहे.
२७ डिसेंबरला मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

पोटनिवडणुकीसाठी ४ ऑक्टोबरला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ३ जानेवारी २०२० पर्यंत हरकती घेतल्या जाणार आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या व मतदान केंद्रांच्या याद्या ८ व ९ जानेवारी २०२० रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत,
तर अंतिम मतदार यादी ११ जानेवारीला प्रसिद्ध होईल. शिवसेना सारिका भुतकर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे त्यांचे पद रद्द करण्यात आले होते.