ते वाक्य एकताच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव :- निळवंडे-शिर्डी-कोपरगाव बंदिस्त नळपाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील शिर्डी, कोपरगावच्या कामास दिलेली स्थगिती औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व घारुटे यांनी गुरुवारी उठवली असल्याची माहिती माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे वृत्त येताच गुरुद्वारा रोडवरील कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करुन व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, विवेक कोल्हे, उपनगराध्यक्ष योगेश बागूल, गटनेते रवींद्र पाठक, विजय आढाव, कैलास जाधव, पराग संधान, भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, जितेंद्र रणशूर, शिल्पा रोहमारे, भारती वायखिंडे, विद्या सोनवणे, सुवर्णा सोनवणे आदी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाल्या, युती शासनाने निळवंडेतून कोपरगावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी ३६० कोटी खर्चास मान्यता दिली होती. त्यास विक्रांत रुपचंद काळे व निळवंडे धरण कालवा कृती समितीने खंडपीठात आव्हान देत शिर्डी ते कोपरगाव दुसरी फेज पाणी योजनेस हरकत घेतली होती.शासनातर्फे अमरजीत गिरासे, संस्थानतर्फे नितीन भवर, विनायक होन, तर नगरपालिकेच्या वतीने विनायक दीक्षित यांनी काम पाहिले.

आमदारकी पाण्यासाठी सार्थकी लागल्याचा आनंद – कोल्हे

कोल्हे म्हणाल्या, निवडणुकीआधी विरोधक व काही विघ्नसंतोषींनी मला बदनाम करुन विरोधात रान पेटवले. मी प्रामाणिक राहून आमदार या नात्याने योजना मंजूर करण्यात खारीचा वाटा उचलला आहे. माझी आमदारकी पाण्यासाठी सार्थकी लागल्याचा आनंद आहे.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले !

निकाल लागल्यानंतर एका ज्येष्ठ नागरिकाने फोनवर अभिनंदन करुन निळवंडे पाणीप्रश्नी ताई तुम्ही जिंकलात, आम्ही हरलो आणि चुकलो, असे सांगताच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment