अहमदनगर लाईव्ह 24 टीम /अहमदनगर :- बहुचर्चित अशोक लांडे खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या अमोल भानुदास कोतकर याला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला आहे.
लॉटरी विक्रेता लांडे याच्या खुनाच्या खटल्यात भानुदास कोतकर, त्याची तीन मुले माजी महापौर संदीप, अमोल यांना नाशिक न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
या शिक्षेविरुद्ध शिक्षा झालेल्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल केले असून. गेल्या वर्षी वैद्यकीय कारणातून मुख्य आरोपी भानुदास कोतकरला जामीन मंजूर झाला होता.
त्याच वेळी अमोल कोतकरचा जामीन अर्जही उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. कोतकरच्या वतीने अभयकुमार ओस्तवाल यांनी जामीन अर्जावर युक्तिवाद करून मुख्य आरोपी भानुदास कोतकर याला जामीन मिळालेला आहे.
या गुन्ह्यात गेल्या चार वर्षांपासून सचिन कोतकर कारागृहात शिक्षा भोगत आहे. नाशिक न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरुद्धचे मुंबई उच्च न्यायालयाचे अपिल चालविण्यासाठी वेळ जाणार आहे, असे मुद्दे मांडले.
त्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला असला तरी नगर जिल्ह्यात येण्यास कोतकरला न्यायालयाने मज्जाव घातला आहे.