लवकरच या खेळाडूकडे टीम इंडियाची कमान !या खेळाडूला नवा कर्णधार बनवण्याची संधी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  कसोटी कर्णधार विराट कोहली याच्या पदाला धोका निर्माण झाला आहे. त्याचा वाईट काळ सुरु झाल्याची चिन्हे दिसून येत आहे.

एकीकडे विराट याला गेली दोन वर्षे चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याला शतकी खेळ करण्यात अपयश आले आहे, तर आता दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्नही भंगले आहे.

बीसीसीआयने याआधीच विराट याला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवले होते, तर त्याने स्वतः टी-20 चे कर्णधारपद सोडले होते. या मालिकेतील पराभवानंतर विराट याच्या कसोटी कर्णधारपदाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

निवडकर्ते विराटऐवजी दुसऱ्या खेळाडूकडे कर्णधारपद सोपवू शकतात. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहली याचे कसोटी कर्णधारपदही धोक्यात आले आहे, यात शंका नाही.

या पदाचा सर्वात मोठा दावेदार रोहित शर्मा असू शकतो. पण बीसीसीआयला प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार हवा आहे आणि अशा परिस्थितीत विराट याच्या जागी 29 वर्षीय के. एल. राहुल याला पुढचा कर्णधार बनवता येईल का, याची चाचपणी करत आहे.

राहुल याने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले. राहुल अडचणींना घाबरत नाही आणि त्याचवेळी कर्णधारपदाचा त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत नाही, असे दिसून आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News