अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- तुम्हाला आमच्या शेजारचे काटे कोणी तोडायला सांगितले होते. असे म्हणत तिघा जणांनी दोन महिलांना लोखंडी गज व लाकडी दांड्याने जबरदस्त मारहाण केली.
या घटनेत मंगल आंबेडकर व रुक्मिणी अभंग या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे घडली आहे. याबाबत मंगल संजय आंबेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगल आंबेडकर या त्यांच्या माहेरी आई-वडिलांच्या घरी होत्या.
तेव्हा यातील आरोपी हे तेथे आले व जोर जोरात ओरडा ओरडा करून मंगल आंबेडकर यांचा भाऊ सुरेश याला बाहेर बोलावून घेतले. त्याला आरोपी म्हणाले की, आमच्या शेजारचे काटे कोणी तोडायला सांगितले, असे म्हणाले.
तेव्हा सुरेश त्यांना म्हणाले की, ती जागा आमची आहे. आम्ही काहीही करू. असे म्हणाले असता त्यांना शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण केली.
त्यावेळी मंगल आंबेडकर सोडवा सोडवी करण्यासाठी आल्या, तेव्हा त्यांना लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांची मावशी रुक्मिणी भागवत अभंग यांनादेखील लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले.
तसेच बंदुकीने गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेत मंगल संजय आंबेडकर व रुक्मिणी भागवत अभंग या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. यामध्ये अण्णासाहेब बोंबले, भाऊसाहेब बोंबले, दत्तू आढाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम