अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. कर्जत नगरपंचायत निवडणूक या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांच्यामुळे संपूर्ण राज्यभर यामध्ये गाजली.
यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे केवळ जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यातच महत्वाची माहिती समोर आली असून कर्जत मध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी बाजी मारली असून राष्ट्रवादी-काँग्रेसचे 10 उमेदवार आतापर्यंत विजयी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
हे आहेत लाईव्ह निकाल
कर्जत नगर पंचायत
राष्ट्रवादी- 6 (6 + 1 (बिनविरोध)=एकूण 7
काँग्रेस- 3
भाजप- 1
राष्ट्रवादी+कॉंग्रेस = 10
कर्जत नगरपंचायत निवडणूक मध्ये 10 जागांवर विजय मिळवून कर्जत नगर पंचायती वर राष्ट्रवादी-काँग्रेस चा झेंडा फडकला आहे. तर या निवडणुकीत भाजपच्या राम शिंदेंना मोठा धक्का बसला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम