अहमदनगर ब्रेकींग: पुण्यातून अपहरण झालेल्या ‘डुग्गू’ च्या मावशीचा अहमदनगरमध्ये अपघाती मृत्यू

Ahmednagarlive24
Published:
Ahmednagar Breaking: Aunt of 'Duggu' abducted from Pune dies in accident in Ahmednagar

पुणे शहरातून काही दिवसांपूर्वी अपहरण झालेला चार वर्षाचा मुलगा स्वर्णव उर्फ डुग्गू सतिश चव्हाण पुनावळे परिसरात बुधवारी दुपारी सुखरूप मिळाला आहे.

त्याला भेटण्यासाठी नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघालेल्या त्याच्या मावशी चा बुधवारी रात्री अहमदनगर-औरंगाबाद रोडवर इंद्रायणी हाॅटेलजवळ अपघाती मृत्यू झाला.

सुनीता संतोष राठोड (वय ३६ रा. कापुस वसाहत केंद्र, नांदेड) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान या अपघातात तिचा पती व दोन मुले जखमी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर अहमदनगरमध्ये उपचार सुरू आहेत.

Swarnav Chavan : अपहरण झालेला स्वर्णव अखेर सुखरूप घरी; आरोपीचा शोध सुरु

पुणे : शहरातील हाय स्ट्रीट (High street) जवळील पाठशाळा (School) परिसरातून ४ वर्षाच्या स्वर्णवचे (4 year old boy) अपहरण (Abduction) करण्यात आले होते. तेव्हापासून स्वर्णवचा (Swarnav) शोध सुरु होता.

11 जानेवारीला स्वर्णवचे अपहरण करण्यात आले होते. अखेर या मुलाचा शोध घेण्यात पोलिसांना (Police) यश आले आहे. पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchawad) परिसरातील पुनावळे परिसरात हा चिमुरडा पोलिसांना सापडला आहे.

स्वर्णवचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. पुणे पोलिसांच्या (Pune Police) शोधकाऱ्याला अखेर यश आले आहे. 300 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकांनी स्वर्णवचा शोध घेतला आहे.

गेले आठ दिवस स्वर्णवचा शोध सुरु होता. सोशल मीडियावर स्वर्णवचे फोटो टाकण्यात आले होते आणि त्याच्याबद्दल माहिती देण्यात आली होती. अखेर स्वर्णवचा शोध लागला आहे. पुणे पोलिसांनी स्वर्णवला त्याच्या आईवडिलांकडे सोपवले आहे.

भाजपचे (BJP MLA) आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी अपहरणकर्त्याचे फोटो (Photo) सोशल मीडियावर (Social media) पोस्ट करत काही माहिती मिळाल्यास ती शेअर करण्याची विनंती केली होती.

पोलिसांना स्वर्णवचा शोध लागला असला तरी आरोपीचा शोध मात्र अद्याप लागलेला नाही. त्यामुळे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अपहरण का आणि कशासाठी केले होते याचा शोध पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe