अहमदनगर लाईव्ह 24 टीम /अहमदनगर:- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था,(सारथी) पुणे, महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्थेच्या तारादूत प्रकल्प अंतर्गत अहमदनगर येथील तारादूतांनी तालुक्यातील श्रीमती अलबर्ट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल व ज्यु. कॉलेज भिंगार या ठिकाणी गाडगेबाबा यांच्या 63 पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन केले.
या अभिवादन कार्यक्रमास सारथी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विजय पठारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ.सविता सकट या होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. शेळके सी.के. यांनी केले.
सौ.स्नेहल बोबडे यांनी गाडगेबाबा यांचे जीवन चरित्र कथन केले. दत्तात्रेय हराळ यांनी सारथी संस्थे चालणारे विविध शासकीय उपक्रम सांगितले. विद्यार्थ्यांच्या वतीने आर्यन धामोरे या विद्यार्थ्यांने आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात सौ.सविता सकट यांनी संत गाडगेबाबा यांचे मंत्रमुग्ध करणारे भजन गाऊन प्रबोधन केले. त्या म्हणाल्या गाडगेबाबा हे आजच्या विद्यार्थ्यांना मार्गदाते आहे. विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेच्या आहारी न जाता श्रद्धा व अंधश्रद्धा यात फरक करता आला पाहिजे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. श्री.देवकर एस.एस. यांनी केले.सारथी संस्थेच्या सौ.शुभदा टेपाले यांनी आभार मानले. तसेच या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून विश्वशंकर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.अनभुले सर तसेच तारादूत ऍड.विशाल गायकवाड, मा.श्री.अतुल सोनावणे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या पर्यवेक्षक सौ.पाटील एस.एम. सौ.घायतडक के.पी यांनी नियोजन केले. उपशिक्षक मा.श्री.देवकर सरांनी सर्वांचे आभार मानले.