अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- येणाऱ्या काळात पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असून, आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या धर्तीवर झेडपी च्या शाळांमधून शिक्षण देणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ह्या आज नाशिकच्या दौऱ्यावर असताना म्हणाल्या आहे.
नाशिक येथे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, येणाऱ्या काळात पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलला जाणार असून तो आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या धर्तीवर झेडपी च्या शाळांमधून शिक्षण देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाववरून वाद निर्माण केला जातो. त्यामुळे मुलांना थोर पुरुषाच्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
तसेच शालेय शिक्षण विभाग प्रत्येक घराशी सबंधित विषय आहे. शाळांमध्ये शनिवार हा पुस्तक विरहित असावा, छंद जोपासण्यासाठी वेळ देणार असून शाळांमध्ये ग्रंथोत्सव आणि शिक्षण उत्सव सुरू करणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
दुसरीकडे ग्लोबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत जाण्यासाठी आवश्यक असणारी रजा मंजूर करण्याचे आदेश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
उच्च शिक्षणासाठी डिसले गुरुजींनी रजेचा अर्ज केला होता. डिसले गुरुजींचा रजेचा अर्ज मंजूर करण्याचे शिक्षण विभागाला आदेश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रणजित डिसलेंना फोन केल्याचे देखील समोर आले आहे. पहिली दुसरीच्या अभ्यासक्रमातील बदलानंतर नवा अभ्यासक्रम कसा असेल हे पाहावे लागणार आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम