अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष कोण होणार याची चुरस असतानाच सहकारी सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
महा विकास आघाडी झाल्यानंतर ची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत आता नेमके सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक कार्यकर्ते एकत्र येऊन आघाडी करतात का गे पाहणे औसुक्याच ठरणार आहे.
या सोसायट्यांचा मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे. त्यानुसार प्रारूप याद्या जाहीर करण्यात आल्या असून या प्रारूप यादीवर हरकत घेण्यासही 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या हरकतींवर जिल्हा उपनिबंधक 9 जानेवारीला निर्णय देतील.
अंतिम मतदार यादी 14 जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर कोणत्याहीक्षणी या सोसायट्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील.
संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी, वाघापूर, कौठे धांदरफळ, मंगळापूर, सुकेवाडी, घुलेवाडी, जाखुरी, कोंची.
राहाता तालुक्यातील पुणतांबा, पुणतांबा विभाग बागाईतदार, माऊली, वाळकी, स्व. बाबुराव किसनराव कडू पाटील.
राहुरी तालुक्यातील निंभेरे, चंडकापूर, अंमळनेर. नेवासा-गोमळवाडी, मुकिंदपूर, नाथकृपा (वाटापूर).
शेवगाव- लखमापूरी, ढोरजळगाव, राणेगाव, अंतरवली खुर्द, ठाकूर पिंपळगाव, शेवगाव, बक्तरपूर.
नगर- दशमी गव्हाण, मदडगाव, बाभळेश्वर(बाळेवाडी),
श्रीगोंदा- शिरसगाव, मुंगूसगाव, हनुमान (माठ), पांडवगिरी (निंबवी), वडगाव शिंदोडी, हनुमान, (भावडी)गव्हाणेवाडी, गणेश (पिसोरे खांड), हंगेश्वर (चिंभळे),शिवशंकर (यवती) सिंध्दनाथ (सांगवी दु.), भाऊसाहेब शिपलकर (शिपलकर), अजिंक्य (काष्टी), विठ्ठल (निमगाव खलू). श्रीगोंदा-शहाजापूर, रूईछत्रपती, घाणेग़ाव-गटेवाडी, वडनेर हवेली, काळकूप