अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- राज्यातील महाविद्यालयांचे वर्ग १ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष म्हणजेच ऑफलाइन सुरू होणार आहेत. मात्र, कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशाच विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे.
मंगळवारी राज्य सरकारने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. कोरोनामुळे मार्च, २०२० मध्ये बंद झालेली कॉलेजेस १३ ऑक्टोबर, २०२१ रोजी ऑफलाइन सुरू झाली.

त्यावेळी कोरोना लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याची परवानगी होती. परंतु, पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने ५ जानेवारीपासून राज्यातील सर्व अकृषी, अभिमत,
स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न कॉलेजांचे प्रत्यक्ष वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता रुग्णसंख्या घटू लागल्याने शाळा सुरू झाल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे लसीकरणही पूर्ण होऊ लागले आहे. यामुळे १ फेब्रुवारीपासून कॉलेजांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात येतील, असे शासन परिपत्रक मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले.
ज्या विद्यार्थ्यांनी दोन लसमात्रा पूर्ण केल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनाच कॉलेजांत तसेच विद्यापीठात प्रवेश दिला जाणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम