मुंबई इंडियन्सच्या ‘या’ माजी खेळाडूचं टि्वटर अकाऊंट झालं हॅक

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :-  क्रिकेट विश्वातील एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. हार्दिक पांड्याचा भाऊ क्रिकेटपटू क्रृणाल पांड्याचं टि्वटर अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे.

बिटकॉइन स्कॅमर असं टि्वट त्याच्या अकाऊंटवर दिसत आहे. या हॅकरने क्रृणालच्या अकाऊंटवरुन अनेक टि्वटस केली आहेत.

‘बिटकॉइन्ससाठी अकाऊंट विकतोय’ असं सुद्धा त्याने टि्वट केले आहे. अकाऊंट हॅक केल्यानंतर सकाळी 7.30 च्या सुमारास पहिलं टि्वट करण्यात आलं.

अज्ज्ञात बिटकॉइन स्कॅमरसनी याआधी सुद्धा काही टि्वटर अकाऊंट हॅक केली आहेत. आता या यादीत क्रृणाल पांड्याचा समावेश झाला आहे.

कोण आहे कृणाल पांड्या? क्रृणाला आतापर्यंत भारतासाठी पाच वनडे आणि 19 टी-20 सामने खेळला आहे.

यंदाच्यावर्षी स्थानिक संघ बडोद्याकडून तो विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळला होता.

पुढच्या महिन्यात आयपीएलसाठी मेगा ऑक्शन होणार आहे. क्रृणाल पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई संघाचा भाग होता.

तो आता अहमदाबाद संघाचा कर्णधार आहे. बंगळुरुमध्ये 12 आणि 13 फेब्रुवारीला मेगा ऑक्शन पार पडणार आहे.