संगमनेर तालुक्यात होणारा बालविवाह चाईल्ड लाईनच्या सतर्कतेमुळे रोखला

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- बालविवाह कायद्याने गुन्हा आहे असे असतानाही जिल्ह्यात आजही अनेक ठिकाणी बालविवाह लावल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक घटनांना रोखण्यात आले आहे.

असाच एक प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह चाईल्ड लाईन आणि घारगाव पोलिसांच्या मदतीने रोखण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी, अहमदनगर चाईल्ड लाईनच्या 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर पठार भागातील एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह गावातील एका मुलासोबत होणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर चाईल्ड लाईनने ही बाब घारगाव पोलीस ठाणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बालकल्याण समिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला कळविली.

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख आणि चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी बालविवाह होत असलेल्या गावात गेले.

तेथे त्यांनी अल्पवयीन मुलीचे पालक आणि उपस्थित सर्वांना कायद्याची माहिती देत बालविवाह करणे हा अपराध असल्याचे सांगितले. त्यानंतर बालविवाह रोखला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe