अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, अॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल असलेला आरोपी गोविंद मोकाटे याला अटक होत नसल्याने,
पीडित फिर्यादी महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आरोपीला अटक होत नाही, तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा महिलेने घेतला आहे.
यावेळी आरपीआयचे (गवई) शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, संतोष पाडळे, ज्योती पवार आदी उपोषणात सहभागी झाले होते.
नगर शहरातील एका उपनगरात राहणार्या महिलेने दोन महिन्यापुर्वी मोकाटेविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मोकाटेविरूध्द अत्याचार, अॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मोकाटे याला अटक होत नसल्याने, पिडीत महिलेने उपोषण सुरू केले आहे. जेऊर (ता. नगर) येथील राजकीय पुढारी असलेल्या मोकाटे गुन्ह दाखल झाल्यापासून पसार आहे.
त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही. आरोपी मोकाटे खुलेआम फिरत आहे. राजकीय वरदहस्त असल्याने त्याला पोलीस प्रशासन अटक करत नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.