…म्हणून लता मंगेशकरांनी लग्न न करता राहिल्या अविवाहित

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक क्षण सांगितले जात आहे.

त्यातीलच एक म्हणजे लता मंगेशकर यांनी लग्न का केलं नाही? तेच जाणून घेऊ या… २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोरमध्ये लतादिदींचा जन्म एका मराठा कुटुंबात झाला होता.

आपल्या पाच भावंडांमध्ये लतादिदी सर्वात मोठ्या होत्या. लता मंगेशकर यांचे वडील पं. दीनानाथ मंगेशकर हे एक रंगमंच कलाकार आणि संगीतकार होते.

लतादिदींना आपल्या संगीत आणि गायनाचा वारसा वडिलांकडूनच घेतला होता. मात्र वडिलांच्या निधनानं वयाच्या १३ व्या वर्षी त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली.

लहानपणी त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडली होती. घराची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या. त्यांना मधेच शिक्षण सोडावं लागलं. भावंडांना सांभाळण्यासाठी आणि घरातील जबाबदारी पार पाडण्यासाठी लतादिदींनी लग्न केलं नाही.

त्यांना स्वतः एका मुलाखतीत हे लग्न न करण्याचं कारण सांगितलं होतं. त्या मुलाखतीत लतादिदी म्हणाल्या होत्या की, “लग्न करण्याचा खूप विचार केला होता.

पण, तो प्रत्यक्ष अंमलात आला नाही. घरातील लहान भावंडांची जबाबदारी असल्यामुळे लग्न करू शकले नाही. भावंडांना संभाळत असताना वेळ कधी निघून गेला हे कळलेच नाही”, असंही त्यांनी सांगितलं होतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe