अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शेतीच्या वादावरून चौघांनी काठीने, लाथाबुक्यांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना नवनागापूर (वडगाव गुप्ता शिवार) येथे रविवारी घडली.
याबाबत बबन बाबूराव गुडगळ (वय ६०, रा. मोहिनीनगर, नगर-बायपास रोड), यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा छबु बबन गुडगळ हा ट्रॅक्टर घेऊन शेत नांगरत असताना, भाऊसाहेब माधव गुडगळ, संगिता भाऊसाहेब गुडगळ,
सागर भाऊसाहेब गुडगळ व सचिन भाऊसाहेब गुडगळ यांनी शेतीच्या वादाच्या कारणावरून बबन गुडगळ व सुरेखा गुडगळ यांना लाकडी काठीने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.
मारहाणीत दोघे जखमी झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी बबन गुडगळ यांच्या फिर्यादीवरून मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.