अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्र सरकारकडून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी चोंडीसाठी ४ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चोंडी येथे पर्यटन वाढावे यासाठी आमदार रोहित पवार सतत प्रयत्न करत होते.
पर्यटन विकासानंतर स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही या ठिकाणी होईल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
आमदार रोहित पवार हे पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून ४ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा व त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला पर्यटनाच्या माध्यमातून होईल या उद्देशाने आमदार रोहित पवारांनी विशेष लक्ष देऊन या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला आहे.
सध्या सीना नदीचे खोलीकरण केल्यानंतर पर्यटन काही प्रमाणात वाढले आहेत. तसेच चोंडी येथे विविध भागातून नागरिक येण्यास सुरुवात झाली आहे.
आता आणखी निधी मंजूर झाल्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा फायदा होईल.असेही पवार म्हणाले आहेत. तसेच पवार हे मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर करून आणत असल्याने मतदारसंघातील नागरिकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच याबाबत पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले कि, आधीच्या लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील अनेक मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते, काही गोष्टींचे फक्त त्यांनी राजकारण केले आहे.
लोकांचं हित लक्षात घेऊन परिसरातील विविध विकासकामांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे.
त्यासोबतच चोंडीपर्यंत जाणारा मुख्य मार्ग आता राज्य महामार्ग करण्यात आला असून त्यालासुद्धा भरघोस निधी माझ्या माध्यमातून देण्यात आला आहे. असे हि ते म्हणाले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम