अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नाशिक : सावत्र मुलीला अनैतिक व्यवसायात ढकलणाऱ्या आई- वडिलांना पाेलिसांनी अटक केली आहे. संशयित घरातच सोळा वर्षीय सावत्र मुलीकडून अनैतिक व्यवसाय करून घेत असल्याचे पाेलिसांच्या छाप्यात उघडकीस आले. सोमवारी (दि. २३) वावरेनगरात पाेलिस आयुक्तालयाच्या अवैध धंदे विरोधी पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वावरेनगर येथे एका घरात सोळा वर्षीय मुलीकडून तिचे सावत्र आई- वडील अनैतिक व्यवसाय करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.
पथकाने येथे ग्राहक पाठवत खात्री केली असता सोळा वर्षीय मुलीकडून व्यवसाय सुरु असल्याची खात्री पटली. बनावट ग्राहकाकडून पैसे घेतांना पथकाने छापा टाकला.
तेथे एका महिलेसह तिच्या पतीला पथकाने अटक केली. संशयिताकडून आक्षेपार्ह वस्तू, उत्तेजक औषध, अश्लिल सिडी आणि अन्य वस्तू जप्त केल्या. संशयित मुलीला उत्तेजनाच्या औषधी गाेळ्या देत तिच्याकडून अनैतिक व्यवसाय करून घेत असल्याचा संशय नाशिक पोलिसांनी व्यक्त केला आहे.