अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाची लोकसंख्या ३६ लाख ४ हजार ६६८ आहे. सरासरी ४२ हजार लोकसंख्येला एक जिल्हा परिषद गट व २१ हजार लोकसंख्येसाठी एक पंचायत समिती गण निश्चित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
आता १२ गट आणि २४ गणांची नव्याने भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या आराखड्यावरुन प्रारुप आराखडा जाहीर करण्यात येणार आहे.

या प्रारुप आराखड्याबाबत कोणाच्या काही हरकती असल्यास त्या सादर केल्या जाणार आहेत. या हरकतींची सुनावणी होऊन हरकतींमध्ये तथ्य असल्यास त्याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगास दिला जाईल.
हरकतींमध्ये तथ्य नसल्यास मूळ आराखडा कायम राहील. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. आगामी जिल्हा परिषदेचे ८५ गट व पंचायत समितीच्या १७० गणांचा आराखडा प्रशासनाच्यावतीने महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना जिल्हा सादर केला.
राज्य निवडणूक आयुक्त आता प्रारुप आराखडा जाहीर करणार आहेत. या आराखड्यानंतर नवीन मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो कराp
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम