शॉटसर्किट मुळे लागलेल्या आगीत 30 एकर ऊस जळून खाक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक धाकददायक घटना घडली आहे. पाथर्डी जवळ असलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून सुमारे 30 एकर ऊस जळून नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्क्यातील तनपुरेवाडी येथील ऊसाच्या शेतातील ऊसतोडणी सुरू असताना शॉटसर्किटमुळे अचानक आग लागली.

मजुरांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग मोठी असल्याने त्यांनी देखील शेताबाहेर पळ काढला. या आगीने तनपुरेवाडी येथील शेजारी शेजारी असलेल्या 10 शेतातील उसाने पेट घेतला आणि मोठं नुकसान झालं आहे.

काही वेळातच पाथर्डी नगर परिषदच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या त्यांना देखील आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे तीन तास लागले.

तो पर्यंत जवळपास 30 एकर वरील ऊस जळाला आहे. या आगीत 10 शेतकऱ्यांच्या उसाच मोठं नुकसान झालं असून सरकारने पंचनामे करून मदत द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान बळीराजावर संकटाची संक्रांत अद्यापही सुरूच असल्याने शेतकरी त्रासला गेला आहे.