आमदार अनिल राठोड यांची भाजपशी जवळीक ? भाजपच्या मोर्च्यात सहभाग

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाकारातून हिंदुत्ववादी संघटनांनी नगरमध्ये आज मोर्चा काढला. या मोर्च्यात शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी मोर्चात सहभाग घेतला.

राज्यात भाजपची संगत तोडत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात धरला असला तरी नगरात मात्र एनआरसीच्या मुद्द्यांवर शिवसेना भाजपसोबत असल्याचे दिसले.या मोर्चात नगर शहर शिवसेनाही सहभागी होत भाजपच्या खांद्याला खांदा दिला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप, शिवसेनेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो नगरकर सहभागी झाले होते.नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी आज हजारो नगरकर रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. जनसमर्थन फेरीतून नगरकरांनी एनआरसी कायद्याला पाठींबा दिला.

खा.सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, शिवसेना उपनेते अनिल राठोड, अभय आगरकर, रा.स्व.संघाचे जिल्हा संघचालक डॉ.रवींद्र साताळकर, शांतीभाई चंदे, वसंत लोढा, भानुदास बेरड, भगवान फूलसौंदर,

नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे,मनोज कोतकर, सोनाली चितळे, अजय चितळे, सुवेंद्र गांधी, चंद्रकांत काळोखे यांच्यासह राष्ट्रीय सायंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, हिंदू राष्ट्रसेना भाजप, शिवसेना अभविपचे यांच्यासह विविध हिंदूत्ववादी संघटनेचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर भारतात प्रथमच अत्यंत मोठे निर्णय घेतले जात असून काश्मीर प्रश्न, राम मंदिरानंतर आता या नागरिकत्व सुधारणा कायद्याची अमलबजावणी होत असल्याचे सांगितले.

शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न या कायद्यामुळे पूर्ण होणार आहे. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन या कायद्याचे समर्थन करावे व देश विघातक शक्तींना विरोध करावा, असे आवाहन यावेळी केले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment