4.54 :- आगामी निवडणूकीत 2024 मध्ये देशात परिवर्तन होईल अस यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
4.52 :- महाराष्ट्र, बंगाल आणि झारखंडमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न पण मला जेलमध्ये टाकण्यासारखी जेल अजून बनली नाही अलिबागमदून 80 वर्षाच्या वृद्धाला उचलून नेलं ईडीच्या अधिकाऱ्यांनी इथेच तू मरणार म्हणून धमकावलं

4.49 :- किरीट सोमय्यांचा उल्लेख ‘मुलुंडचा दलाल’
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून मविआ नेत्यांवर सुरु असलेल्या आरोपानंतर आज संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका करत, त्यांचा उल्लेख ‘मुलुंडचा दलाल’ असा केला आहे.
4.47 :- सोमय्या पिता-पुत्राला तातडीने अटक करा – संजय राऊत किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना PMC घोटाळ्यातील आरोपांखाली तातडीने अटक करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
4.41 :- किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत, किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे, पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि जमीन घेतली दुसऱ्याच्या नावावर
4.31 :- मराठी माणसाविषयी भाजपला द्वेष किरीट सोमय्यांनी काही वर्षापूर्वी मराठी भाषा सक्तीची नसावी असं अपील केलं होतं आणि मुंबईत भाजप मराठी कट्टा चालवते हाच तो, भडवा, दलाल, कोर्टात जातो आधी याचं थोबाड बंद करा
4.21 PM :- वडिलांना अटक करू अशा मुलांना धमक्या दिल्या गेल्या, असे राजकारण महाराष्ट्रात कधी झालं नाही – संजय राऊत
4.19 PM :- भाजपचे प्रमुख नेते भेटले आणि म्हणाले कोणत्याही परिस्थितीत आम्हाला सरकार आणायचे आहे असे सांगितले.
महाराष्ट्रातलं सरकार त्यांना पाडायचं आहे
सरेंडर व्हा अन्यथा, सरकार पाडू अशा धमक्या भाजप देत आहे
एकशे सत्तरचे बहुमत असताना भाजप कुणाच्या भरोशावर तारखा देत आहे?
4.13 PM :- पत्रकार परिषदेआधी शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण आनंदराव अडसूळ, दिवाकर रावतेही पुष्पहार अर्पण करण्यास उपस्थित.
4.10 :- भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर –
Sanjay Raut Press Conference Live :- शिवसेना खासदार संजय राऊत यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. दादर येथील शिवसेना भवनमध्ये संजय राऊत यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेसाठी गर्दी जमली आहे. राज्यभरातील शिवसेना कार्यलयातही शिवसैनिक एकवटले आहेत.