अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव , सोनेवाडी परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. मात्र या चोरटयांनी शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
पोहेगाव, सोनेवाडी येथील नवले मळ्यातून चांगदेव कांदळकर यांची 700 फूट केबल चोरट्यांनी लांबविली. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी केबल स्टँस्टर सायपन झाकणे पाईप व पिंकलर पाईप आदी वस्तू हे चोरटे चोरत आहे.
दरम्यान विहिरीवर पाणी उपसा करण्यासाठी कांदळकर यांनी 700 फूट केबल टाकली होती. चोरट्यानी ही केबल चोरून नेल्या मुळे त्यांचे जवळपास 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकरी आता हवालदिल झाले आहे. या चोरट्यांचा शिर्डी पोलिस स्टेशनचे बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम