अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे. १५ मार्च २०२२ पासून सुरू होणार्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकिट १८ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हॉलतिकीट लॉग इनमध्ये उपलब्ध झाल्यावर त्याची प्रिंट शाळांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहेत. दहावीची परीक्षा येत्या १५ मार्चपासून सुरू होणार आहे.

त्यासाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरील शाळा लॉग-इनमध्ये दुपारी एक वाजल्यानंतर उपलब्ध होतील. त्यानंतर शाळांनी प्रवेशपत्राची मुद्रित प्रत विद्यार्थ्यांना द्यायची आहे.
त्यासाठी शाळांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारायचे नसल्याची स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. हे हॉलतिकीट शाळांना शुक्रवारी, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून www.mahahsscboard.in येथून स्कूल लॉगइन मधून डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होणार आहे.
यासंदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास शाळांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधायचा आहे.
प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास शाळांनी संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र पुन्हा मुद्रित करून त्यावर लाल शाईने ‘डुप्लिकेट’ असा शेरा लिहून ते विद्यार्थ्यांना द्यायचे आहे.
तसेच विद्यार्थ्यांचे छायाचित्र सदोष असल्यास त्यावर नवे छायाचित्र चिकटवून मुख्याध्यापकांनी शिक्का देऊन स्वाक्षरी करायची आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम