अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे शक्य नाही.
त्यामुळे परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरणाची सक्ती नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. मात्र, परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याबाबत पालक, विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती द्यावी.

तसेच पालकांची संमती घेऊनच विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे, असे शिक्षण संचालनालयाने सांगितले आहे. दरम्यान पुढील महिन्यापासून दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे इतक्या कमी वेळात विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे अशक्य आहे.
एका केंद्रावर दररोज ३०० ते ४०० डोस उपलब्ध होत आहेत. सध्या आरोग्य विभागाकडून देखील विद्यार्थी लसीकरणासाठी डोस उपलब्ध होत नाहीत.
त्यामुळे केवळ तीस दिवसांत जिल्ह्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे लसीकरण शक्य नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. एकूण परिस्थिती लक्षात घेता लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांना देखील दहावी, बारावीची परीक्षा देता येणार आहे.
तसेच परीक्षेसाठी लसीकरणाची सक्ती असा कुठलाच आदेश दिला नसल्याचे महाराष्ट्र राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. लस घेतली नाही,
म्हणून कोणीही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहाणार नाही. विद्यार्थी, पालकांची जनजागृती केल्यानंतर त्यांच्या संमतीनेच लसीकरण करण्यात येईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम