पुत्रहट्टामुळे विरोधीपक्षनेता पद गमाविण्याची वेळ !

Published on -

अहमदनगर :- डॉ.सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने पुत्रहट्टामुळे विरोधीपक्षनेता पद गमाविण्याची वेळ राधाकृष्ण विखे पाटलांवर येवू शकते. 

‘काहीही झाले तर मी निवडणूक लढवणारच. कोणताही पक्ष मिळाला नाही तर अपक्ष म्हणून उभा राहणार,’ असा हट्‌ट सुजय विखे यांनी कायम ठेवला असल्याने राधाकृष्ण विखे यांची राजकीय कोंडी झाली होती.

अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडावी यासाठी विखे पाटील यांनी आग्रही भूमिका घेतली होती, राष्ट्रवादीचे अडवणुकीचे धोरण मात्र कायम होते.

राधाकृष्ण विखे यांचे काँग्रेस हायकमांडच्या नजरेत राजकीय वजन वाढले असताना स्वत:चा मुलगा दुसऱ्या पक्षातून उभा राहणे हे त्यांच्याच राजकीय भवितव्यासाठी अडचणीचे ठरणार ह्यात वादच नाहीत..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe